TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन हिल्सवर पोळा उत्साहात !

विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका !

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आदिवासी पारंपारिक देवदानी होळी नृत्य… शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट… संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य… सनई-चौघाड्यांच्या वाद्यासह.. सर्जा-राजा म्हणजे कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक ही जैन हिल्सवरील पोळाचे पारंपारिक महत्त्व अधोरेखित करीत होती. या पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भुमिपुत्रांनी ठेका धरला. वृषभ राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅट्रीक साधली. त्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी प्रथमत: अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पुजन करण्यात आले. जैनहिल्स येथील श्रद्धा ज्योत या श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांचे स्मृतिस्थळ येथे ही मिरवणूक पोहोचून तेथे भाऊंच्या स्मृतिंना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सवाद्य मिरवणूक हेलीपॅडच्या मैदानात रवाना झाली. याप्रसंगी संघपती दलिचंद जैन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, राजेंद्र मयूर, डॉ. शेखर रायसोनी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, सामाजिक कार्यकर्ते युसूफ मकरा, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, अॅड. जमिल देशपांडे, स्वरुप लुंकड, पारस राका, ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील, माजी नगरसेवक अमर जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन प्रो. गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांची उपस्थिती होती. जैन हिल्सवर गत २८ वर्षांपासून साजरा होणाऱ्या पोळ्याच्या क्षणचित्रांचे छायाचित्रे असलेल्या पार्श्वभूमिवर सजावट केलेले भव्य मंडप व व्यासपीठ उभारण्यात आले होते.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

‘यांत्रिकीकरण कितीही होवो परंतु भारतीय शेतीमध्ये वृषभ म्हणजे बैलांशिवाय शेती शक्य नाही. वृषभाचे महत्त्व यापुढेही अबाधित राहणार आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी २८ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करणे सुरू केले. नव्या पिढीच्या प्रतिनिधींना ही भारतीय कृषि संस्कृती अनुभवता यावी, त्याचे महत्त्व समजावे या हेतुने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा उत्सव पाहण्यासाठी बोलावले जाते. बैल पोळा असे म्हणण्याऐवजी हा ‘वृषभ पूजन दिवस’ या अर्थाने रुढ व्हावा.’ असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते सालदारगडींचा सपत्नीक सन्मान

जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी सुरू केली आहे. त्यात कंपनीच्या जैन हिल्स बॉटम, गोशाळा, जैन वाडा, जैन व्हॅली व्ह्यू, ५०० एकर, जैन रेसिडेन्सी ६० एकर, जैन डिव्हाईन पार्क, जेआरसी वैजनाथ साईट, जैन सोसायटी शिरसोली यांचा समावेश आहे. २८ सालदार गडी आणि ३० हून अधिक बैलजोडी काळ्या मातीमध्ये राबत असते. त्या सर्व सालदारगडींचा भेटवस्तु देऊन सपत्नीक गौरव करण्यात येतो. पोळ्याच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, विजयसिंग पाटील, डॉ. कल्याणी मोहरीर, प्रो. गीता धरमपाल आदी मान्यवरांच्याहस्ते गौरव झाला. किशोर कुळकर्णी व संजय सोनजे यांनी सूत्रसंचालन केले.

आदिवासी नृत्य..विद्यार्थ्यांचा जल्लोष..

डोक्यावर बांबू व मोर पीसाचा टोप.. कंबरेवर घुगंरूचा पट्टा बांधून विशिष्ट पद्धतीने मांदल, ढोलकी, तुडतुडी, थाळी, तुमळी, टिमकीवर बुध्या, बावा काली मिरक्या आदिवासी देवदानी नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शौर्यवीर ढोल पथकातील १२० युवक-युवतींचे तालबद्ध वादन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नंदिनृत्यावर अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सालदारांनीही संबळावर नृत्याविष्कार सादर करुन आनंद व्यक्त केला. पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
Next Post

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव ; नितीन गडकरींचे नागरिकांच्या शिष्टमंडळास आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु !

March 27, 2024

एरंडोलच्या नवीन आठवडे बाजाराला श्री संत सावता महाराजांचे नाव देण्यात यावे ; माळी समाजाची मागणी !

December 4, 2021

‘तुझी मर्जी हा तुझा अधिकार होऊ शकत नाही’ ; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

October 23, 2021

देशात मागील २४ तासांत ३ लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद ; ४३९ जणांचा मृत्यू

January 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group