TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा सन्मान !

ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एकत्रितरित्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.

जैन हिल्स च्या सुधिर बोस सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्कारार्थी व भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संजय आढाव, राघव पठाडे, सुधीर भालेराव उपस्थीत होते. यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांची उपस्थिती याप्रसंगी होती. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बुद्धिबळ प्रचार-प्रसाराच्या कार्याला अधोरेखित करून ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ या पुरस्काराने अशोक जैन यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

मकरंद वेलणकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यात ते म्हणाले, बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला तयार होतील या उद्देशाने पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. अभिजीत कुंटे यांनी बुद्धिबळमध्ये अशोक जैन यांच्या कार्याचा आढावा सांगितला. खेळ आणि खेळाडू मोठे झाले पाहिजे या एकाच ध्येयामुळे अशोक जैन यांनी काम केले आणि करित आहे. त्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते सतत कार्य करीत आहे. आमच्यासारख्या खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहत आहेत. आज महाराष्ट्रात ११ पुरूष व ५ महिला ग्रॅंड मास्टर असून अनेक आंतरराष्ट्रीय पंच झाले आहेत. त्याचे श्रेय हे अशोक जैन यांनी केलेल्या पायाभूत कार्यात आहे असेही अभिजीत कुंटे म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना अशोक जैन यांनी लहानपणाच्या बुद्धिबळातील आठवणींना उजाळा दिला. श्री. अभिजीत कुंटे ह्यांनी आपण बुद्धिबळामध्ये कार्य करावे असे सुचविले आणि त्यातूनच पुन्हा बुद्धिबळाकडे वळलो. महाराष्ट्रात चेसिंग स्कूल, चेस लिग सुरू करावे. जेणे करून या स्पर्धात्मक उपक्रमातून चांगल्या गुणवत्तेचे खेळाडू पुढे येतील. सर्वांनी मिळून खेळ वाढविला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सह्याद्री काबीज केला आहे. आता आपण हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. तोही सर करावा. अशी ही अपेक्षा बुद्धिबळ प्रेरणा दिनानिमित्त आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी निलेप पाटील, सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी, जयेश सपकाळे, दुर्वेश कोळी, साक्षी शुक्ला, आम्रपाली खरचाणे, आदिती अलाहीत, आरूष सरोदे, मुस्कान जैन, निधी जैन, धीरज मगरे, प्रकाश पाटील, जयेश निंबाळकर या खेळाडूंसोबत एकत्रीतरित्या (सायमन्स टेनिस) एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. या स्पर्धेत साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली. इंदोर येथील अखिल भारतीय स्तरावरील २००० आतील रेटिंग असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचे सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी यांनी यश प्राप्त केले. त्यामुळे त्यांचा अशोक जैन, अतुल जैन, अभिजीत कुंटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकिल देशपांडे, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य तेजस तायडे, चंद्रशेखर देशमूख, प्रविण ठाकरे, रविंद्र धर्माधिकारी यांनी अशोक जैन यांचा सत्कार केला. संजय पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील यांनीही अशोक जैन यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन नंदलाल गादिया यांनी केले. चंद्रशेखर देशमुख यांनी आभार मानले. नथ्यू सोमवंशी, सोमदत्त तिवारी, आकाश धनगर, संजय काटोले, अजित घारगे, जयेश बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

जळगावात भरदिवसा धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांसाठी भाजपचा जनआक्रोश ; ठाकरे सरकार नालायक असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव : गिरीश महाजन

November 1, 2021

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026

कल्याण बाजार सट्टा जुगाराचा पर्दाफाश: अमळनेर पोलिसांची धाडसी कारवाई

August 7, 2025

खळबळजनक ! मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी घरून निघाल्या ; विहिरीत आढळला दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह

February 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group