अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी जयपाल माणिकराव हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जयपाल हिरे हे याआधी धरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकपदी कार्यरत होते. त्यांची काम करण्याची एक वेगळी शैली असून ते जिल्ह्याला परिचित आहेत. अमळनेरच्या गुन्हेगारीला आळा घालण्यात त्यांना कितपत यश येत ते येणाऱ्या काळात दिसेलच.