जळगाव (प्रतिनिधी) एका परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षापासून अत्याचार करून बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी जळगाव तालुक्यातील भादली गावातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन तिच्या पालकांसह गेल्या दोन वर्षांपासून राहत आहे. याच परिसरातील चमासिंग बिलाला (वय २२) या तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुली गरोदर राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने फिरण्यात दिली असून काल दि. ३० जानेवारी रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी चमासिंग बिलाला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.