जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगत संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना ११ लाख ८२ हजार रुपयात ऑनलाईन गंडविले. हा प्रकार दि. २८ जुलै ते दि. २ ऑक्टोंबर रोजी दरम्यान घडला. याप्रकरणी नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी या दोघ संशयितांविरुद्ध ऑनलाईन फसवणुक प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरात संजय राजाराम वसतकार (वय ४२) हे खासगी नोकरी करुन उदनिर्वाह करतात. दि. २८ जुलै रोजी त्यांना नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी यांनी त्यांचसोबत संपर्क साधला. तसेच वसतकार यांना शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी त्यांच्यासोबत वारंवार संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अॅड करुन त्यांना एक लिंक पाठवली. त्यानंतर कोटक निओ नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन त्यामध्ये पैसे गुंतवविण्यास सांगितले. त्यानुसार संजय वसतकार यांनी डाऊनलोड केलेल्या अॅप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवणुक केली. त्यांनी गुंतविलेल्या पैशांवर वसतकार यांना तब्बल २ लाख ८२ हजार ५९९ रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले.
गुंतविलेल्या रक्कमेवर पावणेतीन लाख रुपयांचा नफा झाल्याचे भासविले. दरम्यान, ऑनलाईन ठगांनी संजय वसतकार यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ३० हजार ४७ रुपये ऑनलाईन बँकींगद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्विकारले. पोलिसात धाव घेत दिली तक्रार काही दिवसानंतर गुंतवणुकीवर झालेला नफ्याची रक्कम प्रत्यक्षात काढता येत नसल्याचे संजय वसतकार यांच्या लक्षात आले. त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लागलीच सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या दोघ ऑनलाईन ठगांविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.