जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका व्यापाऱ्याची फटक्यांची ऑर्डर घेत स्टेट बँकेच्या एका बनावट खात्यावर पैसे भरण्यास सांगून तब्बल २ लाख ४१ हजार ५००रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील आकाशवाणी चौफुली, सागर पार्क रामदास कॉलनीतील रहिवासी असलेले धनंजय लक्ष्मण पाटील (वय ४८ व्यवसाय – व्यापार) यांना २० ते २७ ऑगस्ट दरम्यान ८०९७६६७०३५ या व्हॉटसअॅप नंबरवरून शेखर माखीजा फटाके डिलर या नावाचा वापर करुन कोणीतरी अज्ञात इसमाने धनंजय पाटील यांच्यासोबत संपर्क करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर धनंजय पाटील यांच्याकडून फटाक्यांची ऑर्डर घेत त्यापोटी २ लाख ४१ हजार ५०० रुपये चेकद्वारे Bank of India तील Sheela Chaurasiaya या नावाच्या बँक अकाऊंटमध्ये भरण्यास सांगून फटाक्यांची ऑर्डर घेतली. परंतू मुदतीत फटाके न पाठविता व पैशांची मागणी केली असता ते दिले नाही, म्हणुन आर्थिक फसवणुक केल्याबाबत अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहे.