जळगाव (प्रतिनिधी) शेतक-यांना उध्वस्त करणारे तीन अध्यादेश पारित केले, या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाने आजच्या भारत बंदला जाहीर पाठिंबा मा. वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ) यांच्या आदेशाने दिलेला होता.
आज जळगाव शहर सुध्दा बंद करण्यात आले. यात राष्ट्रीय किसान मोर्चा, बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, असंघटित कामगार संघटना व इतर सहयोगी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करताना सुनिल देहडे (जळगाव शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा), मुकेश सावकारे (जिल्हा अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा) डॉ.शाकीर शेख, अशोक सोनवणे, अजिज बाबा, सुनिल देहडे, सुकलाल पेंढारकर, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, देवानंद निकम, अमजदभाई रंगरेज, अलीमभाई शेख, शैफुल्ला खान, नईमभाई शेख, विजय सुरवाडे, सिध्दार्थ सोनवणे, संजय सपकाळे, निलुताई इंगळे, राजश्री अहिरे, दिपाली पेंढारकर, सुनिता देहडे, विशाखा अहिरे, मुकेश सावकारे, कृष्णा साळवे, विनोदभाऊ रंधे, शुभम अहिरे, विशाल अहिरराव इ. प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
















