जळगाव (प्रतिनिधी) शहरातील भंगाळे गोल्ड या सुवर्ण पिढीसाठी दागिने तयार करून देणाऱ्या कारागिराने १४ लाख रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अस्ता तारक रॉय (रा. मातोश्री बिल्डिंग शनिपेठ जळगाव, मुळे राहणार पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आकाश भागवत भंगाळे (वय ३१, रा. प्लॉट नं. ३०९ ओंकारनगर नटराज टॉकीज समोर दत्त डेअरी मागे हरिनिवास समोर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारागिर अस्ता तारक रॉय (रा. मातोश्री बिल्डिंग शनिपेठ जळगाव, मुळे राहणार पश्चिम बंगाल) हा भंगाळे गोल्ड या सुवर्ण पेढीसाठी लागणारे दागिने गेल्या चार वर्षापासून तयार करून देत होता. त्यामुळे त्याच्यावर भंगाळे यांचा विश्वास बसला होता. सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी 24 कॅरेटचे वेगवेगळ्या वजनाचे सोन्याचे तुकडे कारागिराने नेले होते. या सोन्यात काही दागिने नव्याने तर काही दागिने रिपेरिंग करायचे होते. 273.269 ग्रॅम वजनाचे एकुण 14 लाख 11 हजार 649 रुपये किमतीचा ऐवज कारागिराने फसवणूकीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भंगाळे यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अस्ता तारक रॉय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम विठ्ठल हिरे हे करीत आहेत.