जळगाव (प्रतिनिधी) येथील एसएनडीटी महाविद्यालयात प्रगती गट ग.स. सोसायटी सार्वत्रिक निवडणूकबाबत सहविचार सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग.स. सोसायटीचे अध्यक्ष शरद त्रंबक पाटील यांनी भुषविले. मंचावर उपस्थित प्रगती गट ग.स. सोसायटी अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील, ग.स.चे संचालक राजेंद्र पुंडलिक साळुंखे, मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी विजय पवार, राज्यउपाध्यक्ष आर जे पाटील, प्रल्हाद ठाकरे, प्रभाकर सोनवणे (म न पा सीईओ), प्रा. आर बी पाटील, राज्यउपाध्यक्ष- शिक्षक सेना महेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष-शिक्षक सेना नरेंद्र सपकाळे, सरचिटणीस-शिक्षक सेना नाना पाटील, व उपस्थित सर्व तालुक्यातील शेकडोच्या संख्येने तोलामोलांचे कार्यकर्त, पदाधिकारी, ग स सभासद बंधू उपस्थित होते.
रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रगती गटाची दिशा व कार्य तसेच मागील पाच वर्षात केलेला कामाचा विस्तृतपणे माहिती दिली. शरद त्रंबक पाटील यांनी स्व:तसह लोकशाही गट, प्रगती गटाला विलिन करण्याची घोषणा केली. तसेच ज जि प्राथ शिक्षक सेना संघटना जळगाव यांच्यासोबत युती करण्यात आली. शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय पवार यांनी केले.