जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभात रेस्टॉरंट आणि भरित सेंटरच्या मालकाच्या पाहुण्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धुडकू सपकाळे याच्यासह दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महेश विष्णु रडे (वय ४१, रा. भरतविला, रिंगरोड जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सर्वोदय पेट्रोलपंपच्या बाजुला प्रभात रेस्टॉरंट आणि भरित सेंटर हे हॉटेल असुन त्या हॉटेलवर मी व माझे पाहूणे हेमंत पुरुषोत्तम पाटील (रा.गुरुकुल सोसायटी एमआयडीसी जळगाव) हे देखील हॉटेलवर बसतात. दिनांक 3 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 06.30 वाजेचे दरम्यान हर्षद पटेल याने मला सांगीतले की, आपल्या हॉटेलमध्ये 04 इसम आले असुन त्यांना आपला हॉटेलचा CCTV कॅमेरा चेक करणे आहे. असे सांगीतल्याने मी हॉटेलमध्ये पोहोचलो. तेव्हा मला धुडकु सपकाळे व त्याचे सोबत 3 इसम हे माझ्या दाल काऊंटर जवळील माझ्या कंप्युटरवर CCTV फुटेज बघत होते तेव्हा मी माझ्या हॉटेलमधील माणसांना सांगीतले की, तुम्ही यांना CCTV फुटेज का चेक करु दिले, असे म्हटले. तेव्हा याचा राग धुडकु सपकाळे याला आल्याने त्याने मला शिवीगाळ केली व तु हॉटेल कशी चालवतो व तुझी हॉटेलची तोडफोड करु अशी धमकी देऊन ते हॉटेलच्या विजय पाटील ला बाहेर घेवून निघुन गेले व बाहेरून फोन करून त्यांनी दुसरे 2 लोक बोलविले. त्यानंतर 07.00 वाजेच्या दरम्यान भांडणाचा आवाज एकुन माझे पाहूणे देखील हॉटेलमध्ये आले व त्यांनी मला विचारपुस करीत असतांना धुडकु सपकाळे याने त्याचे सोबत दोन इसम हातात लाकडी दांडका घेवुन आले व दोन अनोळखी इसमांनी हॉटेलमधील हर्षद पटेल व विजु यांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली असता मी व माझे पाहणे हे सोडवासोडव करीत असतांना त्यामधील एका इसमाने माझे पाहणे हेमंत पाटील यांना डोक्यात लाकडी दांडका भारून दुखापत केली. मला धुडकु सपकाळे हा शिवीगाळ करीत होता आम्हाला मारहाण करून धुडकू सपकाळे व त्यांचे सोबतचे दोन अनोळखी इसम निघन गेले माझ्या पाहुण्यास डोक्याला मार लागल्याने रक्त निघत असल्याने त्यांना आम्ही खाजगी वाहनाने उपचारकामी डॉ. अनिल खडके यांचे दवाखान्यात नेले असून त्यांच्यावर तेथे उपचार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धुडकू सपकाळे याच्यासह दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.