जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील तीन तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली तर एक अल्पवयीन मुलला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरातून एका परिसरातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत संशयित आरोपी प्रवीण सुकलाल महाजन याने पळवून नेल्याची घटना दि ६ रोजी रात्री घडली आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण सुकलाल महाजन याच्या विरोधात चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सपोनी संतोष चव्हाण हे करीत आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस काहीतरी फूस लावून पळविल्याची घटना दि ६ रोजी घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महेश किसन पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रदीप इंगळे हे करीत आहेत.
तर पाचोरा पोलिसात एका अल्पवयीन मुलास पळवून नेल्या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दि ६ रोजी अनोळखी संशयित आरोपीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.