जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव येथे प्रदेशाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवक जिल्हाप्रमुख दिनेश कोळी, जळगाव महानगरप्रमुख प्रविण संतोष पाटील, उप महानगरप्रमुख पंकज वसंत पवार, सरचिटणीस महानगरप्रमुख जतीन पंड्या, सरचिटणीस महानगरप्रमुख विजय पाटील, चिटणीस महानगरप्रमुख कल्पेश सपकाळे, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख युसूफ खान, चिटणीस महानगरप्रमुख रोहित कोठावडे, वैधकीय सहाय्यक महानगरप्रमुख नरेंद्र सपकाळे, दिव्यांग आघाडी महानगरप्रमुख नितीन सूर्यवंशी, सदस्य केतन झवर, राज पाटील व इतर प्रमुख उपस्थित होते..
आढावा बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती व प्रवेश सुद्धा घेण्यात आले. नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रहार शेतकरी आघाडी जळगाव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी सोनवणे, जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. निताताई राणे, जळगाव युवक उप महानगरप्रमुख श्री. युवराज राठोड, जळगाव जिल्हा युवक सरचिटणीस राहुल इंगळे, जळगाव युवक उप महानगरप्रमुख मनोज दमाले, जळगाव ऑटो रिक्षा युनियन महानगर प्रमुख अजय बनसोडे, जळगाव युवक तालुकाध्यक्ष सतिष सपकाळे, सौ. मीनाताई महाजन, सौ. आशाताई महाजन, उत्तम पाटील, सुनिल राठोड, ज्ञानेश्वर ताडे, जितेंद्र बिऱ्हाडे, मजीद अली, तेजस भंगाळे, रवी पाटील, सिद्धार्थ शिंदे, बाळकृष्ण रडे, केतन चव्हाण यांना अनिलभाऊ चौधरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जळगाव शहरात महापालिकेच्या माध्यमातून इतर पक्षांच्या ऐवजी प्रहार जनशक्ती पक्ष पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न असून महापालिका निवडणूकीत उमेदवार देण्याची आमची तयारी आहे. याबात उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. प्रस्थापित पक्षांच्या कामगिरीवर जळगावकर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. म्हणूनच योग्य त्या तरुण चेहऱ्याचा शोध प्रहार जनशक्ती पक्षाकडून घेतला जात असून अनेक आजी – माझी पदाधिकारी यासोबतच समाजात विविध क्षेत्रात काम करणारे उमेदवार आमच्या संपर्कात असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली आहे.