जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर जयश्री सुनील महाजन तसेच विरोधी पक्षनेते सुनील भाऊ महाजन यांचा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या सर्व फ्रंटलच्या अध्यक्ष यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, महानगर सचिव कुणाल पवार अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मजार पठाण तसेच महानगर अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष डॉक्टर रिजवान खाटीक, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौसर काकर, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गौरव लवंगे, महानगर सरचिटणीस जयेश पाटील, महानगर उपाध्यक्ष अखिल पटेल तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.