जळगाव (प्रतिनिधी) तीस लाख रुपयांसाठी सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता चुंबळे यांचा खून करण्यात आला. परंतू खूनापुर्वी त्यांना संशयीत मारेकऱ्यांनी चहातून चहातून झोपेच्या गोळ्या दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी त्यांच्या खून करण्यासाठी अत्यंत मायक्रोप्लानिंग करुन त्यांच्या हत्येचा कट रचल्यानंतर त्यांची हत्या केल्याचे यातून दिसून येत आहे.
नवनवीन खुलासे येताय समोर !
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता चुंबळे यांचा तीस लाख रुपयांसाठी गळा आवळून न खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात फेकून त्याची विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी खून करणाऱ्या जिल्हा परिषदेचा कर्मचारी जिजाबराव पाटील व विजय निकम हे दोघे पोलिसांच्या कठोडीत आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात असल्याने दररोज नवनवीन खुलासे देखील समोर येत आहे. दोघ मारेकऱ्यांनी स्नेहलता चुंबळे हे ग. स.च्या मिटींसाठी जळगावात येणार असल्याचे माहित होते. तसेच ते बँकेतून तीस लाख रुपयांची रोकड देखील काढणार असल्याचे त्यांना माहित होते. मिटींगच्या तीन दिवस अगोदर चुंबळे या जळगावात आल्या होत्या. त्यानंतर त्या जिजाबराव पाटील याच्यासोबत बँकेत पैसे काढण्यासाठी देखील गेल्या होत्या. परंतु बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना इतक्या मोठी रक्कम कॅश स्वरुपात देण्यास नकार दिला होता. परंतु बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भेट घेतल्यानंतर बँकेने चुंबळे यांना दि. २० रोजी तीस लाख रुपयांची रोकड दिल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.
चहामध्ये टाकल्या झोपेच्या गोळ्या !
बँकेतून पैसे काढल्यानंतर जिजाबराव पाटील व विजय निकम हे दोघे स्नेहलता चुंबळे यांना सोबत घेवून नाशिकच्या दिशेने रवाना झाले. पारोळा सोडण्यानंतर ते एका दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले. याठिकाणी दोघ संशयितांनी चुंबळे यांची नजर चुकवून त्यांच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून तो चहा त्यांना पाजल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. सेवानिवृत्त परिचारीका स्रेहलता चुंबळे यांचा मृतदेह अद्याप देखील सापडलेला नाही. पोलिसांकडून मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम सुरुच आहे. संशयित मारेकऱ्यांनी चुंबळे यांच्या मृतदेहाची दुसऱ्या पद्धतीने विल्हेवाट लावली तर नाही ना? या शक्यतांची देखील पडताळणी करुन तपास केला जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. मात्र तांत्रिक पुरावे बघता मृतदेह संशयितांनी चुंबळे यांचा मृतदेहाची त्याच परिसरात नेवून विल्हेवाट लावल्याची शक्यता अधिक असल्याचे ते यावेळी म्हणाले.
अत्यंत चालाखीने करीत रचला हत्येचा कट !
चुंबळे यांचे संशयीत मारेकरी जिजाबराव पाटील व विजय निकम हे दोघे पोलिस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याने दररोज नवनवीन माहिती तपासात समोर येत आहे. त्यामुळे संशयितांनी चुंबळे यांच्या खूनाचा अत्यंत चालाखीने आणि मायक्रोप्लानिंग करीत चुंबळे यांच्या हत्येचा कट रचून त्यांचा खून केला. तसेच मृतदेहाचे देखील त्यांनी विल्हेवाट अंत्यंत चालाखीने लावल्यामुळे पोलिस देखील चक्रावले आहेत. सुरुवातीला परिचारीका बेपत्ता झाल्याची तालुका पोलिसात नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास करीत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू आता वीस दिवसांपेक्षा अधिक कालावधील उलटून देखील मृतदेह मिळून येत नसल्याने या गुन्ह्यात संशयितांनी पुरावे नष्ट केल्यासंबंधीचे कलम देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.