जळगाव (प्रतिनिधी) एक लाख रुपये देवून मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वजण घरात गाढ झोपलेले असतांना, पहाटेच्या सुमारास लग्नात तयार केलेले सोन्याचे दागिने घेवून नववधू रफूचक्कर झाली. ही धक्कादायक घटना दि. १७ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लग्न जुळविणाऱ्या पुजा विजय माने ( (वय ३२, रा. महाडीकवाडी, सांगली), नववधू नंदीनी राजू गायकवाड (रा. आकोअ फाईल, आकोला), तीची मैत्रीण निता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन लाखांची मागणी !
महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशीनाथ चौधरी यांचा मुलगा मयुर याचे लग्न करायचे असल्याने त्यासाठी ते मुलगी शोध होते. त्यासाठी चौधरी यांनी मुलाचा बायोडाटा तयार करुन तो नातेवाईकांसह मित्रमंडळींमध्ये प्रसारीत केला होता. दि. १३ फेब्रुवारी रोजी चौधरी यांना पुजा विजय माने यांचा फोन आला. तीने तुमच्या मुलाचा बायोडाटा मी बघितला.असून आमच्याकडे मुलगी आहे. तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे येवून मुलगी बघून घ्या असे सांगितल्यानंतर ते मुलगी बघण्यासाठी गेले. मुलगी पसंत पडल्यानंतर पुजा माने या महिलेने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले.
विवाहसोहळा पार पडल्यानंतर दिली एक लाखांची रोकड !
लग्ग्राची खरेदी केल्यानंतर दि. १६ मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थिीतीमध्ये मयूर चौधरी याचे नंदीनी गायकवाड या तरुणीसोबत विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी मुलीकडून पुजा माने, नंदीनीची मैत्रीण निता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पुजा माने हीला एक लाख रुपये दिले.
शिरुर येथील एकाची केली होती फसवणुक
नववधूसह तीची मैत्रीण घरातून निघून गेल्याचे चौधरी यांनी पुजा माने या महिलेला सांगितले असता, तीने शोध घेवून सांगते असे म्हणत आपला मोबाईल बंद करुन ठेवला. बरेच दिवस संपर्क होत नसल्याने चौधरी यांचे साडू रविंद्र चौधरी यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शिरुर येथे नववधूसह पुजा माने हीने नंदीनी हीचे वैजापुर तालुक्यातील तरुणासोबत विवाह लावून त्यांची फसवुणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार दि. २२ रोजी चौधरी यांनी देखील पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार नववधूसह लग्न जुळविणारी व तीची मैत्रीण या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
घरासमोर आलेल्या चारचाकीतून नववधूसह मैत्रीण पसार !
लग्नकार्य आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री जेवण करुन सर्वजण गाढ झोपलेले असतांना पहाटेच्या सुमारास नववधू नंदीनी व तिची मैत्रीण या घरात दिसून आल्या नाही. त्यामुळे चौधरी कुटुंबियांनी त्यांचा संपुर्ण परिसरात शोध घेतला. मात्र तरी देखील त्या दोघीही मिळून आल्या नाहीत. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना सांगितले की, पहाटेच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जातांना पाहिले. यावेळी त्यांनी लग्गात तयार केलेले सुमारे ६० हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने घेवून पसार झाले.