जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हे दि.16 जून रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. यावेळी शरद पवार हे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांच्या घरी देखील सदिच्छा भेट देणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हे दि.16 जून रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्यांचा दौरा प्राप्त झाला असून अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबीरास ते मार्गदर्शन करणार आहेत. खा.शरद पवार यांचे दि.15 रोजी मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने रात्री 8.50 वा. जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. तेथून ते जैन हिल्सकडे प्रयाण करणार आहेत. दि.16 रोजी सकाळी 9.20 वा. अमळनेर येथे त्यांचे आगमन होणार असून याठिकाणी ग्रंथालय विभागाच्या शिबीराचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
दु. 12.30 ते 1.30 हा वेळ उमेश पाटील यांच्या निवासस्थानी राखीव असून दुपारी 3.30 वा. खा.पवार यांचे जळगाव येथील आहुजा नगरमध्ये योगेश देसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. साधारण अर्धा तास पवार हे देसले यांच्या निवासस्थानी थांबणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वा. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असून सायंकाळी 5 ते रात्री 10.30 पर्यंत जैन हिल्स येथे वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. रात्री 11.30 वा. अमरावती एक्सप्रेसने खा.पवार हे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. दरम्यान, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी साहेब भेट देणार असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक असल्याचे देसले यांनी म्हटले आहे. आमच्या परिवारा तर दिवाळी दसऱ्याचा सण असल्यागत उत्साह निर्माण आहे.