जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डोहरीतांडा येथील स्वत:च्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या सख्ख्या भावाला शनिवारी जामनेर न्यायालयाने तीन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
डोहरी तांडा येथील २२ तरूण २८ मार्च २०२२ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत घरात आला. या वेळी घरात झोपेत असलेल्या सख्ख्या बहिणीचा त्याने विनयभंग केला. या वेळी घरात आई देखील झोपलेली होती. या प्रकारामुळे तरुणीने आरडाओरड केल्याने जाग आलेल्या आईने मुलाच्या तावडीतून मुलीला सोडवले. या वेळी त्याने आईसह बहिणीला धमकी ही दिली. परंतू जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत विकृत भावाला ताब्यात घेतले होते. जामीन झाला नसल्याने तो जेलमध्येच होता. खटला सुरु असताना साक्षीदार फितूर झाले होते. परंतू, ठाम असलेल्या तक्रारदार महिलेमुळे न्यायाधीश यांनी आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर हा खटल्याची केवळ दोन महिने १२ दिवसात सुनावणी पूर्ण करत जामनेर न्यायालयाचे न्यायधीश डी. एन. चामले यांनी हा निर्णय दिला.
















