बुलढाणा (प्रतिनिधी) नांदुरा तालुका जिल्हा बुलढाणा येथील युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जय सेन सरदार हे राज्य प्रवक्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता प्रत्येक कार्यकर्त्यासह नेत्यांना लागली आहे. आता नवीन चेहरे समोर येतील आणि त्यामध्ये समावेश जय सेन सरदार यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासह प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्षबाबतचा निकाल लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
















