नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी एकूण १,५०,८३८ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी ४३,२०४विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत. चिराग फलोर या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तर रुडकी झोनमधून कनिषा मित्तल या आयआयटी रुडकीच्या विद्यार्थीनीने ३९६पैकी ३१५ मार्क मिळवत १७वा क्रमांक पटकावला आहे. JEE Advanced 2020 Result पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://result.jeeadv.ac.in/ या वेबसाईटवर लॉग इन करा. त्यानंतर परीक्षेचा Advanced Roll Number, जन्म तारीख आणि फोन नंबर लिहून सबमिट करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होऊन त्यावर विद्यार्थी आपला रिझल्ट पाहू शकतात.
















