चोपडा (प्रतिनिधी) बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
या संदर्भात अधिक असे की, रवींद्र मंगल पाटील (रा. वढोदा ता.चोपडा) हे आपल्या पत्नीसह दि.१४ रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान, चोपडा बस स्थानकात आले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रवींद्र पाटील यांच्या पत्नीच्या गळयात असलेल्या पर्सची चैन उघडून पर्समधील तब्बल २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनिरी घनशाम तांबे हे करीत आहेत.