मुंबई (वृत्तसंस्था) १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड संरक्षण मंत्रालयात नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. स्टोअरकीपर ग्रेड-III, नागरी व्यापार प्रशिक्षक, कुक, लस्कर, एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन), नाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२२ असणार आहे.
१) स्टोअरकीपर GD-III – ०३ पदे
२) नागरी व्यापार प्रशिक्षक ट्रेड – रेजिमेंटल सर्व्हेयर टेक्निकल, इलेक्ट्रीशियन, फिटर, इंजिन आर्टिफिसर, वेल्डर, कारागीर (बांधकाम), कारागीर (धातूशास्त्र), कारागीर (लाकूडकाम), पेंटर आणि डेकोरेटर, पीसीआर आणि डीएसव्ही- २२पदे
३) कुक – ०९ पोस्ट
४) लस्कर- ०६ पदे
५) MTS- २४ पदे
६) नाभिक – ०१ पदे
पगार
स्टोअरकीपर, सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, कुक यांना दरमहा १९,९०० रुपये वेतन दिले जाईल. तर लस्कर, एमटीएस, नाई यांना दरमहा १९ हजार रुपये वेतन दिले जाईल.
शैक्षणिक पात्रता
1 ) स्टोअरकीपर GD-III – उच्च माध्यमिक (१२वी वर्ग) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
२) नागरी व्यापार प्रशिक्षक – मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण आणि संबंधित व्यापारात ITI किंवा NCVTअसावा.
3) कुक – मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास.
४) लस्कर – मान्यताप्राप्त वोर्डातून १०वी पास.
५) MTS – 108 4
६) नाभिक – १० वी पास
वयोमर्यादा
उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे.
अर्ज कसा करायचा
या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी/कौशल्य चाचणी/व्यावहारिक चाचणीच्या आधारे केली जाईल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी बॉम्बे इंजिनिअर ग्रुप एमटीएस रिकूटमेंट २०२२ साठी त्यांचे अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे अधिसूचनेवर दिलेल्या पत्यावर पाठवावी लागतील.