चोपडा (प्रतिनिधी) पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान अवैध गावठी कटटयांची निर्मिती करण्याऱ्यावर आळा बसावा. तसेच अट्टल गुन्हेगाराना वेळीच आळा घालण्याचे नियोजन मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्याच्या बैठकीत करण्यात आले. तसेच जुने व नविन काही आरोपी मिळून यावे, यासाठी दोघं राज्याच्या पोलिसांनी सहकार्य करावे असा निर्णय सुध्दा घेण्यात आला.
दि. 26 रोजी बलवाडी व पारउमर्टी ता. वरला येथे समक्ष जावुन संशयीत तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपीतांचा कोंम्बीग ऑपरेशन मोहिम राबवुन शोध घेण्यात आला. तर पारउमर्टी ता. वरला गावातील घरांच्या घरझडत्या घेवुन बनविण्यात येणा-या गावठी कटटयाबाबत कच्चे मटेरिअल व तयार गावठी कटटयांबाबत शोध घेतला. तसेच गावातील काहि संशयीत चार चाकी व दुचाकी वाहनांची तपासणी केली. परंतु दोन वाहनांचे कागदपत्र मिळून न आल्याने ते वरला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान पारउमर्टी येथिल उपस्थित गावक-यांची बैठक घेतली असता बैठकिस गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते.
गावकऱ्यांना अवैध गावठी कटटयांची निर्मिती व विक्री करु नयेत. त्यामुळे समाजात मोठया प्रकारचे खुन,दरोडे,दुखापती यासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. अश्या प्रकारचे गुन्हे येथुन पुढे घडू नयेत म्हणुन अवैध गावटी कटटयांची निर्मिती करुन नये व कोणासही विक्रि करु नये बाबत स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत. या बैठकीस जळगाव पोलीस व मध्यप्रदेश पोलीस यांच्यात संयुक्त बैठक होत सिमावर्ती भागातील पाहिजे असलेले आरोपी यांचा शोध घेणेकामी संयुक्त कोम्बींग ऑपरेशन राबविणेबाबत बैठकीत नियोजन करण्यात आले.
सदर कोंबींग ऑपरेशन कामी अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव रमेश चोपडे,पोलीस अधिक्षक, चोपडा ऋषीकेश रावले, सो,सहाय्यक पोलीस अधिक्षक ,चाळीसगाव देशमुख, उपअधिक्षक,कावेरी कमलाकर (पो. नि. चोपडा ग्रामीण) के.के.पाटील (पो. नि.चोपडा शहर) पो.स्टे.नितनवरे सहा.पोलीस निरीक्षक व चोपडा ग्रामीण कडिल एकुण 15 व आरसीपी प्लॉटुन नं. 7 चे 13 पोलीस अंमलदार असे हजर होते. तसेच मध्यप्रदेश येथिल कमलसिंग चव्हाण पोलीस उपअधिक्षक सेंधवा भाग,वरला पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक शंकरसिंह रघुवंशी,पोउनि पाटील व वरला पो.स्टे. चे 12 पोलीस अंमलदार अशांनी मिळुन वरला पोलीस ठाणे येथे समक्ष हजर होते.