अमळनेर (प्रतिनिधी) वेबपोर्टल असोसिएशनच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी पत्रकार ईश्वर महाजन यांची निवड करण्यात आली असून दहीवद येथील लोकनियुक्त सरपंच यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
पत्रकार ईश्वर महाजन यांच्या निवडीबद्दल त्यांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अधिकारी यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव झाला. तसेच वेब पोर्टल असोसिएशन मुंबई येथील अध्यक्ष अनिल महाजन यांनी नुकतीच ईश्वर महाजन यांची निवड केली. पत्रकार महाजन यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व निवडीबद्दल दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सहपत्निक शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. पत्रकार ईश्वर महाजन यांचे कार्य उल्लेखनीय आहे .आपण आपल्या कार्यातील सातत्य असेच राहो व उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.पत्रकार महाजन सत्कार प्रसंगी म्हणाले की आपण माझ्या घरी येऊन माझा हदय सत्कार केला. आपल्या शुभेच्छा मला भावीवाटचालीस निश्चितच कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.