नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणत्याही घटनेनंतर सोशल मीडियावर त्याबाबत मीम्सची लाट आलेली असते. प्रामुख्याने सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. परंतु, आता सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा पब्लिक फिगर व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या पॉलिसीला अपडेट केले आहे.
फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटीगोन डेव्हिस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे यूजर्स लोकांची प्रतिमा खराब करतात आणि ऑनलाईन त्रास देतात त्यांना कठोरपणे हाताळले जाईल. कंपनीने धोरण बदलून सार्वजनिक व्यक्ती आणि इंडिविजुअल यांच्यातील फरक हायलाइट केला आहे, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य अंमलबजावणी करता येईल.
फेसबुक सामूहिकरित्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या पोस्ट काढून टाकेल. यासह, इनबॉक्समध्ये थेट संदेश पाठवण्याचे नियम देखील बदलले जातील. कंपनी प्रोफाइल आणि पोस्टवर कमेंटला सिक्योर करेल. फेसबुकने म्हटले आहे की, सेलिब्रिटी आणि नामांकित लोकांची लिस्ट बनवली जाईल, ज्यामुळे त्यांना ऑनलाइन छळापासून वाचवले जाऊ शकेल.
फेसबुकचे पॉलिसी अपडेट त्याचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांच्या खुलाशानंतर आले आहे. टाइम मासिकाने हॉगेन यांचे खुलासेही प्रकाशित केले होते. असे सांगण्यात आले की फेसबुकने सोशल मीडियावरील चुकीच्या माहिती आणि द्वेषयुक्त पोस्टविरोधात लढणाऱ्या टीमच्या सर्व सदस्यांना वेगळे केले आहे. फेसबुकने डिसेंबर २०२० मध्ये ही टीम काढून टाकली. हॉगेनने असेही म्हटले की कंपनीने आपले अंतर्गत सर्वेक्षण देखील लपवले, ज्यावरून हे दिसून आले की इंस्टाग्राम अल्गोरिदम तरुणांच्या मनावर कसा नकारात्मक परिणाम करत आहे.
दरम्यान, कंपनीने फेसबुक वर इंस्टाग्रामवर पब्लिक डिबेटसंदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,२५९ अकाउंट, पेज आणि ग्रुपला बॅन केले आहे. फेसबुकने ईराणमधील ९३ फेसबुक अकाउंट, १४ पेज, १५ ग्रुप आणि १९४ इंस्टाग्राम अकाउंटला हटवले आहे, याद्वारे इतर यूजर्सला टार्गेट केले जात होते. सुदानमध्ये देखील फेसबुकने ११६ पेज, ६६६ फेसबुक अकाउंट, ६९ ग्रुप आणि ९२ इंस्टाग्राम अकाउंटला हटवले आहे.