धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे १५ दिवसाच्या सुटीवर गेल्यामुळे उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन यांनी आज प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नगरसेवक राजेंद्र महाजन व विलास महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात घोषणा केली होती.
लहान माळीवाडा परिसरातील गबानंदा चौकात १६ जानेवारीला नगरसेवक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन व विलास महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विद्यमान उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार दिला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज कल्पना महाजन यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. सौ. महाजन यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पालिका गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासू चौधरी, पी.एम. पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांनी अभिनंदन केले.