अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मच्छी मार्केट परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी धाड टाकत काशीनाथ गोपीचंद पाटील (वय ४०, रा. खरदें, ता. धरणगाव) या इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून “कल्याण बाजार” नावाने सट्टा खेळवित असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी ही कारवाई केली.
दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी, पोलिस नाईक रमण निकुंभे, पोहेकॉ विनोद सोनवणे, पोकॉ अमोल पाटील, व पोकॉ मयूर पाटील यांनी सपोनि रवींद्र पिंगळे यांच्या आदेशानुसार पंचासह मच्छी मार्केट परिसरात सापळा रचला. सदर ठिकाणी संशयित इसम सट्ट्याचे आकडे मोबाईलवरून लोकांना पाठवत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
झालेल्या कारवाईत ५,००० रुपये किमतीचा वीवो कंपनीचा मोबाइल (IMEI नं. 868905065923691 / 868905065923683) तसेच ₹२५० रोख रक्कम जप्त करण्यात आली. व्हॉट्सअॅपमध्ये सट्ट्याचे आकडे पाठविल्याचे पुरावे पोलिसांनी मोबाइलमध्ये आढळून आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.