जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी जितेंद्र कंडारेचा वाहन चालक कमलाकर भिकाजी कोळी याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी जितेंद्र कंडारे याचा वाहन चालक कमलाकर भिकाजी कोळी हा रविवारी सकाळी बीएचआरच्या मुख्य शाखेत वाहन लावण्यासाठी आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कमलाकर कोळी याने पोलिसांना सांगितले की, मी कंडारे यांना औरंगाबाद ते अहमदनगरच्यादरम्यान सोडले. कंडारेला नेमकं कुठं सोडले?, याबाबत पोलिसांनी विचारले असता, कमलाकर कोळीने समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून पुणे नेण्यात होते. दरम्यान, कोळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.