भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी येथील दिपक रमेश तायडे यांनी सुवर्णा शांताराम सोनवणे उर्फे सुवर्णा नितीन कोळी यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10(1)(अ) नुसार जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबत मा.जिल्ह्याधिकारी जळगांव यांचेकडे ग्राम पंचायत विवाद अर्ज दिला होता.
अर्जदार यांच्या तक्रारी अर्जाच्यान्वये अनुसूचित जमाती प्रमाण पत्र तपासणी समिती धुळे यांनी त्यांच्या कडील प्रकरण सुवर्णा शांताराम सोनवणे उर्फे सुवर्णा नितीन कोळी यांचे टोकरे कोळी बाबतचे जात प्रमाण पत्र हे खोटे व बनावट असलेमुळे मे समिती धुळे यांनी रद्द केलेले असलेमुळे ग्राम पंचायत सरपंच म्हणून अपात्र होण्यास पात्र असल्याची सुनावणी केली होती .
अनुसूचित जमाती प्रमाण पत्र तपासणी समिती धुळे यांनी त्यांच्या कडील प्रकरण मधील आदेशास मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी कुठल्याही प्रकारचा स्टे.अथवा कोणत्याही प्रकारचा अंतरिम आदेश दिलेला प्रथम दर्शनी दिसून आलेला नाही.
यामुळे मा.अमन मित्तल जिल्ह्याधिकारी जळगांव यांनी अर्जदार यांचा अर्ज मंजूर केला आहे. सरपंच ग्राम पंचायत कंडारी ता. भुसावळ या पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे.या बाबतचा आदेश दिनांक दिनांक 1/11/2022 रोजी पारित केला आहे.