बंगळुरु (वृत्तसंस्था) हिजाब वादामुळे कर्नाटकात (karnataka) तणावाचं वातावरण असताना एका बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या (Bajrang Dal Activist Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हर्षा असं हत्या झालेल्या २६ वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. हिजाबविरोधी पोस्ट केल्याच्या कारणातून हर्षाची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिजाब विरोधी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कर्नाटक सध्या हिजाब वादाचे केंद्रबिंदू ठरला आहे. शिमोगा येथे सातत्याने आंदोलनं होत आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून काही काळ कलम 144 ही लागू करण्यात आले होते. अशा स्थितीत शिमोगा येथील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. त्यातच थेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या खुनामुळे हा तणाव आणखी वाढला आहे.
नेमकं काय घडलं?
बजरंग दलाच्या २६ वर्षीय कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.