नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती वेदव्यासचार श्रीशानंद यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय खंडपीठाने याप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाकडून खुलासा मागवला आहे. तसेच अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनादेखील मदतीसाठी बोलावले आहे.
न्यायमूर्ती श्रीशानंद यांचे दोन व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दोन्ही व्हिडिओ एका खटल्याच्या सुनावणीतील आहेत. एका व्हिडिओत न्यायमूर्ती बंगळुरूतील मुस्लिमबहुल भागाचा उल्लेख पाकिस्तान असा करतात. या परिसरात फार काही चांगली स्थिती नाही, असे न्यायमूर्ती म्हणतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये न्यायमूर्ती श्रीशानंद यांनी एका महिलेशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसते. तुम्हाला विरोधी पक्षाबद्दल बरीच माहिती आहे. बहुतेक तुम्ही त्यांच्या अंतर्वस्त्रांचा रंगदेखील शकता, सांगू असे न्यायमूर्ती म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा जयसिंह यांनी वकील गुरुवारी सोशल मीडियावर ट्विट करत सुप्रीम कोर्टाला या वादग्रस्त वक्तव्यांची दखल घेण्याचे आवाहन केले होते. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने शुक्रवारी याप्रकरणाची दखल घेत कठोर दिशानिर्देशांची गरज व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर सोशल मीडियाचे लक्ष आहे. अशावेळी न्यायमूर्तीनी बोलताना भान ठेवले पाहिजे. कर्नाटकच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वेदव्यासचार श्रीशानंद यांचे वक्तव्य चर्चेत आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, असे सरन्यायाधीश म्हणाले. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाला दोन दिवसांत अहवाल दाखल करण्यास सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार आहे