TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्नाटक हिजाब वाद : विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज फडकावला ; जाणून घ्या..नेमका काय आहे वाद

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटकातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या हिजाबवर बंदी (Karnataka Hijab Row) घालण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकातील हिजाब बंदीच्या वादात आता शिमोगा येथील एका महाविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला.

कलम १४४ लागू

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी वर भगवा झेंडा फडकावत आहे, तर बाकीचे विद्यार्थी खाली जल्लोष करताना दिसत आहेत. तेथे जमलेले बहुतांश विद्यार्थी भगवे झेंडे आणि उपरणे फडकावत होते. शिमोगा येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ​या घटनेवर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी जोरदार टीका केली आहे. “कर्नाटकमधील काही शैक्षणिक संस्थांची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, एका ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावण्यात आला आहे. मला वाटतं, या संस्थांना शिक्षा व्हायला हवी. कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी हे एक आठवडा बंद ठेवून ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवता येईल,” असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण

कर्नाटक हायकोर्टात हिजाबच्या वादावर सुनावणी सुरू असताना आणि हिजाब घालण्यावरून विद्यार्थी आणि सरकार यांच्यात वाद सुरू असताना, निदर्शने आणखी तीव्र झाली आहेत. मंगळवारी कर्नाटकातील उच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी भगवी शाल आणि हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. बागलकोटमध्ये दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

न्यायालय भावनांनुसार नाही तर संविधानानुसार चालणारे

मंगळवारी याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालय भावनांनुसार नाही तर संविधानानुसार चालणारे आहे. संविधान हीच न्यायालयासाठी गीता आहे. जो काही निर्णय होईल तो सर्व याचिकांना लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत म्हणाले की, हिजाब घालणे हा मुस्लिम संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यानंतर महाधिवक्ता म्हणाले, महाविद्यालयांना गणवेश निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी महाविद्यालयच्या समितीशी संपर्क साधावा.

असा सुरू झाला वाद?

कर्नाटकात उडुपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. जर ड्रेस कोड लागू असेल तर वेगळा पोशाख घालून येणाऱ्या लोकांना कॉलेजमध्ये बसू दिले जाणार नाही, असे कॉलेजने म्हटले आहे. त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अशा प्रकारे हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे आणि कलम १४ आणि २५ चे उल्लंघन आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धरणगाव हादरलं : अवघ्या ५० रुपयासाठी गेला एकाचा जीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी नवविवाहित दाम्पत्य मृत्यू प्रकरण : दोन्ही गटातील तीन आरोपींना जामीन मंजूर !

January 13, 2021

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान !

April 23, 2021

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026

महाराजस्व अभियानाअंतर्गत पिंप्रीत फेरफार अदालत !

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group