केरळ (वृत्तसंस्था) केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली. ते सरकारी रुग्णालयातून कोरोनावर उपचार घेणार असल्याचे सांगितले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी क्वारंटाइन व्हावं असंही त्यांनी आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिनरायी विजयन हे उथ्तर केरळमधील कन्नूर येथील आपल्या घरी आहेत. त्यांना कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती देखील मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केली आहे.
















