केरळ (वृत्तसंस्था) देशात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये आता केरळची परिस्थिती चिंता वाढली आहे. केरळमध्ये दररोज ५-६ हजार प्रकरणे समोर येत आहेत. येथे मंगळवारीही ६०४९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच हे आकडे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रकरणांपेक्षाही दुप्पट आहेत.
महाराष्ट्रात मंगळवारी ३१०६ नवीन संक्रमित आढळले. ४१२२ लोक रिकव्हर झाले आणि ७५ जणांचा मृत्यू जाला. आतापर्यंत १९ लाख २ हजार ४५८ लोक संक्रमित झाले आहेत. यामधील ४८ हजार ८७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५८ हजार ३७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. १७ लाख ९४ हजार ८० लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. केरळमध्ये आता ६१ हजार अॅक्टिव्ह केस आहेत. तर महाराष्ट्रात ५८ हजार आहेत. देशात मंगळवारी २३ हजार ८८० केस समोर आल्या आणि २७ हजार ३२ रुग्ण बरे झाले. ३२९ जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस ३४९८ ने कमी झाल्या. देशात आतापर्यंत १ कोटी ९९ लाख केस समोर आल्या आहेत.