पुणे (वृत्तसंस्था) पंतप्रधान यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केल्यामुळे भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, हे स्पष्ट झाले आहे.
जयंत पाटील यांनी पाळ्या ट्वीटमध्ये म्हटले की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. हेच ट्वीट ‘रिट्वीट’ करत खडसेंनी पक्षांतारचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दुसरीकडे खडसेंच्या मुंबईत होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे चिन्ह खडसेंच्या फ्लेक्सवरून हटविण्यास सुरवात केली आहे.