TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार !

नविन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाचे विद्यार्थीही अभ्यासणार महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2023
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात आज महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कराराद्वारे शैक्षणिक, संशोधन आदान-प्रदान, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आदींचा समावेश आहे. याअंतर्गत विद्यापिठातील विद्यार्थ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमांमधे सहभागी होता येणार आहे.

महात्मा गांधीजींची विचारधारा यांचा प्रचार-प्रसारासाठी पीजी डिप्लोमा, संपोषित ग्रामीण पुर्ननिर्माणासाठी स्नातकोत्तर डिप्लोमा, संघर्ष परिवर्तनवर कार्यशाळा, युवा पिढीचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प, आंतरराष्ट्रीयस्तरावर शांती व अहिंसेच्या संदर्भात विंटर स्कूल, संशोधनासाठी वेगवेगळे इंटर्शनशिप, फेलोशिप, महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन यांच्यासह गांधी विचार संस्कार परिक्षा, ग्रामविकास असे विविध उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित असते. या सर्व उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील विद्यार्थ्यांनाही यात संधी निर्माण होणार आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने यापूर्वी अमेरिकेतील एरिझोना स्टेट विद्यापीठ, मेक्सिकोमधील सायंटिस विद्यापीठ, महात्मा गांधीद्वारा स्थापित गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, इटली येथील पीस फाऊंडेशन आदींमधे यापूर्वी सामंजस्य करार केलेले आहेत. या श्रृखंलेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

या करारावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. डॉ. गिता धर्मपाल यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या, यावेळी विद्यापिठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व संचालक डॉ. राजेश जावळेकर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने वरिष्ठ सल्लागार व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, समन्वयक उदय महाजन, असोसियट प्रोफेसर डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. विद्यापीठातर्फे प्रा. ए. एम. महाजन, प्रा. सतीष कोल्हे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. पी. पी. माहुलीकर, डॉ. विकास गिते, प्रा. प्रविण पुराणीक, प्रा. उमेश गोगडीया, प्रा.दीपक सोनवणे, सीए. रवींद्र पाटील, पीआरओ डॉ.सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. के. बी. पाटील यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन व विद्यापीठाच्या कराराद्वारा भविष्यात युवकांसाठी रचनात्मक शिक्षण प्रणालीत नव-नवीन संकल्पना साकार होतील. डिग्रीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव घेता येईल, असे प्रतिपादन यावेळी केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी हा करार ऐतिहासीक असल्याचे सांगितले. डॉ. राजेश जावळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
Next Post

खळबळजनक : जळगावात एकाच्या घरावर दगडफेकसह चक्क गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाची नुकसान भरपाई करणार आरोपी ; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

February 28, 2022

फैजपूरच्या ‘आकाश’ची अमेरिकेतील आकाशात झेप !

May 16, 2021

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

September 5, 2023

तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो, महिलेची दीड लाखांत फसवणूक ; पारोळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

December 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group