जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे जळगाव व मुक्ताईनगर येथे खडसे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
खडसेंवरील आरोपांमुळे २०१६ मध्ये त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा पारभव झाला. त्यानंतर ईडी कडून त्यांना सातत्याने विविध चौकशीसाठी नोटीस येत राहिल्या. यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसेंना काय पद मिळते? याकडे लक्ष होते. कार्यकर्त्यांची ही प्रतिक्षा संपली असून राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. यानंतर जळगाव व मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी नाथाभाऊ समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
















