जळगाव (प्रतिनिधी) भाजप नेते किरीट सोमय्या किरीट सोमय्या यांनी आधी आपली औकात पहावी आणि नंतरच बोलावे, अशी कडवट टीका आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी एका बिल्डरला ३४५ कोटी गिफ्ट दिले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करून खळबळ उडवून दिली आहे. एवढेच नव्हे तर, मी दिलेली कागदपत्रं चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्याला हात लावून दाखवा, असे जाहीर आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले होते. त्यावर ना. गुलाबराव पाटील यांनी आज जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ना. पाटील म्हणाले की, सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी लवकर ठाण्यातील रूग्णालयात उपचार घ्यावेत. तेथे शॉक दिल्यास कदाचित सोमय्या ठिकाणावर येतील. ते उध्दव ठाकरे यांच्या पायाशी बसून खासदार झाले असून आता ते काहीही बरळत आहेत, असेही ना. पाटील म्हणाले.