धरणगाव (प्रतिनिधी) येथील परीट धोबी समाजाच्या वतीने आज गाडगे महाराज जयंती निमित्त लांडगे गल्लीत गाडगे बाबा यांचे प्रतिमा पूजन आणि हभप. आर. डी. महाजन यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित झाला.
सविस्तर वृत्त असे की, येथील परीट धोबी समाजाने राष्ट्रसंत, कर्मवीर गाडगे महाराज यांच्या यांच्या जयंती निमित्त येथील प्रसिद्ध कीर्तनकार, तसेच बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेतील शिक्षक हभप. आर. डी. महाजन सर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. येथील लांडगे गल्लीत सुरवातीला राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय महाजन, गटनेते कैलास माळी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, नगरसेवक शरद कंखरे, नंदू पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, ऍड वसंतराव भोलाने, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ लीलाधर बोरसे, शिवसेना उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, भाजपा शहर अध्यक्ष दिलीप महाजन, सचिन पाटील, छोटू जाधव, अशोक देशमुख, कैलास धनगर, अक्रम खान, किरण रोकडे, घनश्याम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर येथील प्रसिद्ध साहित्यिक, कवि व निवृत्त मुख्याध्यापक बी. एन. चौधरी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवसेना लोकसभा क्षेत्र सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी धोबी समाजाचे विनोद रोकडे, छोटू भाऊ जाधव, प्रकाश जाधव, गणेश जाधव प्रकाश जाधव, रवींद्र जाधव, सुनील चौधरी, प्रा कविता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
हभप आर. डी. महाजन सर यांनी संत मुक्ताबाई महाराजांच्या अभंगावर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचचे प्रबोधन पर विचार प्रकट करत त्यांच्या जीवनाच्या अनेक गोष्टींचे दाखले सांगून श्रोत्यांची मने जिंकली. अध्यात्म आणि प्रबोधन असा मेळ त्यांनी या कीर्तनामध्ये साधला आणि म्हणून उपस्थित सगळ्यांनी त्यांच्या कीर्तनाचे कौतुक केले. राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी आपल्या आयुष्यात समाजप्रबोधनाचे मुख्य साधन म्हणून कीर्तनाच्या वापर केला. त्याच साधनांच्या साह्याने आर. डी. महाजन सर यांनी त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या शैलीमध्ये किर्तन केल्यामुळे खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबा जयंती साजरी झाली. सदर कार्यक्रमासाठी परीट समाजाचे जिल्हा संघटक छोटू भाऊ जाधव, लॉड्री धारक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, भिका महाले, जिल्हा संघटक कन्हैया रायपूरकर, तालुका अध्यक्ष अशोक जाधव, शहर अध्यक्ष गणेश जाधव, युवक शहर अध्यक्ष विनोद रोकडे, शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, नितीन जाधव, शंकर जाधव, प्रकाश जाधव, प्रमोद जाधव, विनोद जाधव, कैलास सूर्यवंशी, विश्वास जाधव, भूषण जाधव यांनी मेहनत घेतली.