नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Poll result 2022) यायला सुरुवात झाली आहे. पंजाबचे (Punjab Assembly Election) एक्झिट पोल हाती आले असून पंजाबमध्ये सत्तांतर होताना दिसत आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची (aap) सत्ता येताना दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ४० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा गोंधळ सपला असून, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ आहे. तर, गोव्यात विधानसभेच्या एकूण जागा ४० आहेत आणि बहुमताचा आकडा २१ आहे. दुसरीकडे, मणिपूरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ६० आहे आणि बहुमताचा आकडा ३१ आहे. १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी एक्झिट पोलनुसार निकाल जाहीर झाले आहेत.
इंडिया टुडे – एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल – (पंजाब)
इंडिया टुडे – एक्सिस माय इंडिया यांच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला ७६ ते ९० जागांसह बहुमत मिळणार आहे. तर, काँग्रेस १९ ते ११, अकाली दल ७ ते ११, भाजप आघाडीला १ ते चार जागा मिळणार असल्याचे चित्र आहे.
टाइम्स नाऊ सर्वेचा – (पंजाब)
टाईम्स नाऊच्या सर्वेनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसणार असून आम आदमी पार्टी मोठा पक्ष असणार आहे. या ठिकाणी आम आदमी पार्टीला ७० जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला २२ जागा मिळतील व एसएडी + १९ जागा, भाजपा आघाडी पाच जागा आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे .
इंडिया टीव्ही एक्झिट पोल – (गोवा)
इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार १९ जागांसह भाजपा हा गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असणार आहे. काँग्रेसला १४+ जागा मिळण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसला दोन आणि आम आदमी पार्टीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर ५ जागा जिंकू शकतात. म्हणजेच गोव्यात कोणीही स्वबळावर सरकार बनवत नसल्याचे दिसत आहे.
झी न्यूज एक्झिट पोल – (गोवा)
झी न्यूज एक्झिट पोल नुसार गोव्यात भाजपाला १३-१८ जागा मिळू शकतात, काँग्रेसला १४-१९ जागा मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात एमजीपीला २-५ जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाला १-३ जागा मिळू शकतात तर इतरांना १-३ जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश
टाव्ही-9 च्या एक्झिट पोलनुसार 403 जागांच्या उत्तर प्रदेशात भाजपला यंदा 211 ते 225 जागा मिळण्याचा अंदा आहे. तर सपाला 146 ते 160 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसप 14 ते 24 तर तर काँग्रेसच्या खात्यात 4 ते 6 जागा येण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेनुसार यूपीत भाजपला 262 ते 277 तर सपाला 119 ते 134 बसपला 7 ते 15 आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेत इतर पक्षांच्या खात्यात 2 ते 6 जागा देण्यात आल्या आहेत.
जन की बातच्या सर्व्हेत उत्तर प्रदेशात भाजपला 222 ते 250 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सपाला 135 ते 165 जागांचा अंदाज आहे. बसप 4 ते 9 जागांवरच अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तराखंड
एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोल नुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. 70 पैकी काँग्रेस 32 ते 38 तर भाजपला 26 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इथं आपला 2 तर इतर पक्षांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.