भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा पदभार कुमार चिंथा यांनी नुकताच स्वीकारला आहे.
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड यांची नवी मुंबई सहाय्यक आयुक्तपदी बदली झाल्यानंतर हे पद रीक्त झाले होते. त्यामुळे आता तात्पुरता पदभार कुमार चिंथा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी चिंथा यांनी भुसावळ शहरातील तालुका, बाजारपेठ पोलिस ठाण्यांना भेट देत अधिकार्यांकडून प्रलंबित गुन्ह्यांसह भौगोलिक क्षेत्राची माहिती जाणून घेतली. बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांनी त्यांचे स्वागत केले.