मुंबई (प्रतिनिधी) महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केली. त्यानुसार जे महसुली, निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे. ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक इतर ज्या निजामकालीन नोंदी असतील. त्यांना कुणबी दाखले दिले जातील. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर यासाठी आम्ही एक निवृत्त न्यायमूर्तीसंह पाच सदस्यांची समिती गठीत केली आहे. तसेच यासंदर्भातले दोन्ही जीआर आजच काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवृत्त न्यायमूर्तींची समिती एका महिन्यात अहवाल देईल. यानंतर कुणबींचे दाखले मिळतील.
आम्ही हैदराबादच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे यांच्याशी मी देखील संवाद साधलेला आहे. त्यांनी आंदोलन मागं घ्यावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तर एकनाथ शिंदे म्हणाले, लाठीचार्ज संदर्भात जिल्हा अधिक्षकांना सक्तेच्या रजेवर पाठवले. उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे. समाजाच्या भावनांचा आदर राखने आमची जबाबदारी आहे.
















