धरणगांव प्रतिनिधी –शहरातील मोठा माळीवाडा फुलहार गल्ली परिसरातील धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माहिती अधिकार ( RTI ) जिल्हाध्यक्ष सत्यशोधक राजेंद्र वाघ यांच्या धर्मपत्नी सत्यशोधिका ललिता राजेंद्र वाघ यांना एरंडोल येथे “सावित्री शक्तिपीठ पुणे” यांच्या माध्यमातून “सावित्रीमाई फुले पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्षा जयश्री नरेंद्र पाटील उपस्थित होते. प्रमुखअतिथी म्हणून सावित्री शक्तीपीठ प्रकल्प प्रमुख रावेर येथील एस बी महाजन, निवृत्त तहसिलदार अरुण माळी,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रविंद्र महाजन, विजय महाजन, दशरथ महाजन, रमेश महाजन,सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील उपस्थित होते. विचारमंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका ज्ञानज्योती स्फूर्तीनायिका सावित्रीमाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावित्री शक्तीपीठ पुणे येथील संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुनिता शिंदे, प्रकल्प प्रमुख एस बी महाजन यांच्या मार्गदर्शनाने ललीता राजेंद्र वाघ (धरणगाव ), आरती अतुल महाजन (एरंडोल ), सुरेखा मोतीराम माळी ( चोपडा ), अँड.भाग्यश्री कैलास महाजन (पाचोरा ) व लतिका दयाराम वाघ ( भडगांव ) या पाच तालुक्यातील महिलांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार ” देऊन मान्यवरांच्या हस्ते मानपत्र – मुर्ति – पुष्पगुच्छ – ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.
धरणगाव येथील ललिता राजेंद्र वाघ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सावित्री शक्तीपीठ पुणे यांनी त्यांना मानपत्र, सावित्रीमाई फुले यांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष एच डी माळी, राष्ट्रीय किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, सत्यशोधक शिवदास महाजन, प्रल्हाद महाजन, कविराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाजन सर तर आभार कुणाल महाजन यांनी केले.