यावल (प्रतिनिधी) भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वपक्षीय संबंध जोपासले होते विविध पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे अतिशय आपुलकीचे संबंध होते, असे भावूक शब्द आज जयंत पाटील यांनी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन प्रसंगी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेनिमित्त ना. जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी चोपडा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर थेट भालोद गाठून दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी हरीभाऊंच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे कार्य अजरामर असल्याचे सांगितले. त्यांनी हरीभाऊंच्या पत्नी कल्पनाताई व पुत्र अमोल जावळे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा हा स्नेहाचा ओलावा हरीभाऊ जावळे यांच्या सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाच्या आठवणींना उजाळा देऊन गेला. याच स्नेहाचा ओलावा आज पहायला मिळाला.