चोपडा (प्रतिनिधी) वेब मिडीया असोसिएशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली आज चोपडा तालुका वेब मिडीया असोसिएशनची कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्षपदी लतीश जैन तर सचिवपदी विश्वास वाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
वेब मिडीया असोसिएशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वेब मिडीया असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडीया यांनी विभागीय समन्वयक नंदलाल मराठे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पी. शिरसाठ व जिल्हा संघटक संजिव शिरसाठ, जिल्हा सचिव कमलेशभाऊ वानखेडे, सचिव अनिलकुमार पालीवाल व जिल्हा सरचिटणीस श्याम जाधव जिल्हा समन्वयक सचिनभाऊ जैस्वाल, समन्वयक संदिप ओली, जिल्हा खजिनदार मिलींद सोनवणे (चोपडा), यांच्या उपस्थितीत चोपडा तालुका वेब मिडीया असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सर्व निवड झालेल्या वेब मिडिया असोसिएशन चोपडा पदाधिकारी यांचे अभिनंदन तालुका व जिल्हा स्तरातुन होत आहे.
वेब मिडीया असोसिएशन चोपडा तालुका कार्यकारणी
तालुका अध्यक्ष-लतीषभाई जैन तालुका उपाध्यक्ष- कैलास बाविस्कर, तालुका उपाध्यक्ष – डॉ. सतिष भदाणे तालुका सचिव – विश्वास वाडे, तालुका सरचिटणीस- महेश निंबा पाटील, तालुका सरचिटणीस- शुभम माळी, तालुका संघटक -रविंद्र पाटील, तालुका सह- संघटक – हेमकांत गायकवाड
















