अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर-पारोळा-भडगाव रस्त्यावर बहारादरवाडी फाट्यावर दुरुस्ती करणे या कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर-पारोळा-भडगाव या रस्त्यावर बहादरवाडी ते सडावण या दरम्यान ही दुरुस्ती होत असून गेल्या काही वर्षात त्याची डागडुजी झाली नाही, म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रा.मा.क्र 1 कि.मी.168/00 आणि 169/00 ते 170 ची सुधारणा करणे, ता. अमळनेर अंदाजित किंमत रु ६७ लाख ९९ हजार लक्ष ५२१ कामाचे भूमिपूजन अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजु फाफोरेकर, रढावणचे भैय्यासाहेब पाटील, पंकज पाटील, बहादरवाडीचे रमेश पाटील, रामकृष्ण पाटील, चिंतामण पाटील, भटु पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रामकृष्ण विक्रम पाटील, खोकरपाटचे भरतसिंग पाटील, उत्तमसिंग पाटील, दिलीप राजपूत सडावणचे अशोक पाटील, मधुकर पाटील, ठेकेदार भगवान महाजन, सा.बां.चे उपअभियंता दिनेश पाटील, शाखा अभियंता सत्यजित गांधलीकर यांच्यासह ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.