मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संत मुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी मुक्ताईनगर साखर कारखाना २०२०-२१च्या सातव्या बॉयलर अग्निशमन व गाळप हंगामाचे उद्घाटन कारखाना ठिकाणी करण्यात आले. यावेळी मा.मंत्री एकनाथराव खडसे व मंदाताई खडसे आणि रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या हस्ते गळीत हंगाम सोहळाचा शुभारंभ करण्यात आला.
नाथाभाऊ यांनी पक्षांतर केल्यामुळे भाजप प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहेत परंतु मोजकेच कार्यकर्ते भाजपमध्ये राहिल्याने उपस्थितांपेक्षा स्टेजचेच फोटो टाकले जात आहेत. भाजपच्या बैठकीत जेवढे कार्यकर्ते उपस्थित नसतात त्यापेक्षा जास्त नाथाभाऊ यांच्या घरी दररोज कार्यकर्ते नाथाभाऊ यांचे अभिनंदन करण्यासाठी असतात. भाजपचे नेते म्हणत आहेत, नाथाभाऊ गेल्यामुळे भाजपला छिद्र सुद्धा पडले नाही. परंतु लवकरच भाजपला भगदाड पडेल तेव्हा त्यांना कळेल. याचबरोबर पुढे बोलताना रविंद्र पाटील म्हणाले, नाथाभाऊ यांनी मतदारसंघात सुरू केलेल्या उपसा सिंचन योजना नाथाभाऊ यांनी पाठपुरावा करून पूर्णत्वास न्याव्या अशी नाथाभाऊ यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
याप्रसंगी चेअरमन शिवाजीराव जाधव, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैया पाटील, माजी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्षा नजमाताई तडवी, विनोद तराळ आदी व्यासपिठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प. सदस्य कैलास सरोदे, निलेश पाटील, वैशाली तायडे, वनिता गवळे, बोदवड पं.स. सभापती किशोर गायकवाड, पं.स. सदस्य राजेंद्र सावळे, विनोद पाटील, प्रदीप साळुंखे, गणेश पाटील, ईश्वर राहणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, साहेबराव सिंगतकर, विशाल खोले महाराज, शाहिद खान, किशोर चौधरी, वसंत पाटील, कल्याण पाटील, देवेंद्र खेवलकर, आबा माळी, दिपक झाबड, प्रमोद धामोळे, रामदास पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, विनोद कोळी, सईद बागवान, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, हाजी मुन्ना तेली, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवाजी पाटील, रामभाऊ पाटील, राजू माळी, विश्वनाथ चौधरी, बी.सी. महाजन, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.