धरणगाव (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय उत्सव समितीतर्फे महाराष्ट्राची मुलूख मैदान तोफ प्रा.डॉ.सुषमा अंधारे यांचे प्रबोधन पर व्याख्यानाचे 6 मे रोजी सायंकाळी 7 वाजता साने पटांगणावर आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डी.जी. पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्ञानेश्वर महाजन, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीश बयस, धरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, ओबीसी सेल भाजप जिल्हाध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे सरचिटणीस भानुदास विसावे, धरणगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र महाजन आदी उपस्थित असणार आहेत. तसेच सर्वांनी या दणदणीत व्याख्यानाला उपस्थिती देऊन प्रबोधनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केले आहे.
















