जळगाव (प्रतिनिधी) शहरात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति आयोजित सावित्री उत्सवामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रभावती बावस्कर (कास्ट्राईब महासंघ जिल्हाध्यक्ष) यांचे व्याख्यान संपन्न झाले.
व्याख्यानात सावित्रीबाई फुले आजची स्त्री या विषयावर प्रभावती बावस्कर यांनी विविध उदाहरणे देऊन प्रकाश टाकला. तसेच ऐतिहासिक उदाहरणाच्या माध्यमातून महिलांचे व पुरुषांचे प्रबोधन केले. कार्यक्रम गुगलमिट च्या माध्यमातून ऑनलाइन संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका साळवे प्रास्ताविक मनीषा सूर्यवंशी वक्त्यांचा परिचय निशा पाटील तर आभार प्रदर्शन अर्चना सपकाळे यांनी केले.
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याच्या गौरवार्थ महिला शिक्षणदिन साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यानिमित्ताने उपक्रमशील शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने जनसेवेचे व्रत घेतलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा " समाज शिक्षिका पुरस्कार " सन २०२० - २०२१ देऊन…
जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने समितीतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. जयंती दिनानिमित्ताने रामेश्वर भदाणे शिवव्याख्याते (अमळनेर) यांचे राष्ट्रमाता जिजाऊ समजून घेऊया! या विषयावर यूट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्यान संपन्न झाले. सदर व्याख्यानात रामेश्वर भदाणे…
जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनापर्यंत समितीतर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 'चला कार्यकर्त्यांना वक्ता बनवूया' या उपक्रमांतर्गत समितीच्या उगलाल शिंदे, सुधीर काळवाघे, के. आर. केदार, मनीषा सूर्यवंशी, यांची व्याख्याने ठेवण्यात आली.…