TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. कोरोना काळात ग्रामीण पातळीवर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्साह वाढला आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र, काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत. परंतु, असे असले तरी निधी वाटपासह महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत सापत्न वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी काँग्रेसच्या नेतेमंडळीकडून केल्या जात आहेत. याचेच पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी काँग्रेसने वेगळी चूल मांडत ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्हा हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसचा प्रभाव ओसरून भाजपने जिल्ह्यात पाळेमुळे रोवली. मात्र, आता पुन्हा भाजप विरोधात वातावरण निर्माण झाल्याने काँग्रेस ग्रामीण पातळीवर निश्चितच मुसंडी मारेल, असा विश्वास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आहे.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

कोरोनाच्या काळात होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. ही पक्ष विरहीत मानली जात असली तरी या निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल समजतो, असे मानले जाते. म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच ग्रामीण भागात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यात कार्यकर्तेही स्वबळावर लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. म्हणूनच काँग्रेसने ‘एकला चलो रे’ भूमिका घेतली आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी अनेकदा काँग्रेससोबत दगाफटका केला आहे. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ग्रामीण भागात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक संधी असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. याचाही विचार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळेच काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना म्हणाले की, ही निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठीची निवडणूक मानली जाते. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गावपातळीवर बैठक घेतल्या. त्यात कार्यकर्त्यांनी संमिश्र मते मांडली. धर्मनिरपेक्ष मताच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायला हरकत नाही. तसेच ज्याठिकाणी आपली ताकद आहे, त्याठिकाणी मात्र स्वबळावरच लढायला हवे, असा आग्रह धरला. या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देता येऊ शकतो, असाही कार्यकर्त्यांचा सूर होता. कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काँग्रेसची ताकद पाहता ७० ते ८० टक्के ग्रामपंचायतींमध्ये स्वबळावर लढण्यावर आमचे एकमत झाले आहे. काँग्रेस निश्चितच आपली ताकद दाखवून देईल, असाही विश्वास डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : नशिराबादमधील सर्व उमेदवारांची ग्रामपंचायत निवडणूकीतून माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता ; वाणिज्य मंत्रालयाने आयात शुल्क कमी करण्याचा दिला प्रस्ताव !

December 27, 2021

टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी – अधीक्षक पी. बी. सेलूकर

October 9, 2020

शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : बाळासाहेब थोरात

December 7, 2020

‘दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’

January 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group