मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. परंतु, अनेक ठिकाणी यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. नुकतेच हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीने सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावरून MIMचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “वो करे तो लीला… हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह..!!” असे जलील यांनी ट्विट केले.
“वो करे तो लीला… हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह..!!” असे जलील यांनी ट्विट केले. सोबत कुंभमेळ्यातील गर्दीचा व्हिडिओदेखील त्यांनी शेअर केला आहे. सोबतच “जर माझ्या शेजारचे छोटे दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला जात असेल, तर विमानतळांवरील सर्व दुकाने नेहमीप्रमाणे का सुरू आहेत? नुकतीच मुंबई विमानतळावर ग्राहकांसह सर्व दुकाने सुरू असल्याचे पाहिले!” असेदेखील जलील यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यातील संभाव्य लॉकडाउनबाबात देखील खासदार जलील यांनी टीका केली होती. हे नेत गरिबांच्या हिताचा निर्णय घेणार नाहीत,त्यामुळे आता गरिबांनाच स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल, लढावं लागेल. असं जलील यांनी म्हटलं होतं. त्यांनी औरंगाबादमधील लॉकडाउनच्या निर्णयाला देखील जोरदार विरोध दर्शवला होता.